वांगी पिकांची लागवड व मशागत संपूर्ण माहिती ! वांगी लागवड हंगाम .
![]() |
| वांगी पिकांची लागवड व मशागत संपूर्ण माहिती ! |
लागवड हंगाम .
वांग्याची लागवड तिनही हंगामात करू शकता. खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्टमध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्टेबर अखेर करतात आणि रोपे आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावतात.उन्हाळी हंगाम–बी जानेवारीच्या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारी महिन्यात केली जातेवाण :
मांजरी गोटा :
या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्यमहिन्यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल.
वैशाली :
या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल.
प्रगती :
या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्टरी सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल.
अरूणा : या जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्यात लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल वांग्याच्या वरील जाती शिवाय कृष्णा एम एच बी 10 या अधिक उत्पादन देणा-या संकरीत जाती आहेत.
अरूणा : या जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्यात लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल वांग्याच्या वरील जाती शिवाय कृष्णा एम एच बी 10 या अधिक उत्पादन देणा-या संकरीत जाती आहेत.
लागवड .
वांग्याची रोपे गादीवाफयावर तयार करतात. गादीवाफे 3 बाय 1 मिटर आकाराचे आणि 10 ते 15 सेमी उंचीचे करावेत. गादीवाफयाभोवती पाणी देण्यासाठी सरी ठेवावी. एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफयातील रोपे पुरेशी होतात. वांग्यांच्या एक हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्हणजे काही रोप न जगल्यास ही रोप नांगे भरण्यासाठी वापरता येतात. गादी वाफयावरील रोपे 12 ते 15 सेंटीमिटर उंचीची झाल्यावर म्हणजे 6 ते 8 पानांवर आल्यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत वाफयांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफयाच्या भोवती असलेल्या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे.मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे.
रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घ्यायची काळजी !
लागवडीनंतर रोपावर पाने लहान होणे किंवा बोकडया (लिटल लिफ) या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेमध्ये वाफयावर बी पेरताना फोरेट 10 टक्के दाणेदार औषध 3 बाय 1 मिटर आकाराच्या वाफयासाठी 20 ग्रॅम या प्रमाणात बियाण्याच्या दोन ओळींमध्ये टाकावे. रोपांवर मावा, तुडतुडे फूलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बी पेरल् यानंतर दोन आठवडयांनी 12 मिलीलिटर एन्डोसल्फॉन (35 टक्के) किंवा 20 मिलीलिटर मॅलेथिऑन (50 टक्के ) किंवा 2.5 मिलीलीटर फॉस्फॉमिडॉन ( 85 टक्के) किंवा 10 मिलीलिटर डयमेथोएट (30 टक्के ) किंवा 10 मिलीलीटर फार्मोथिऑन (25 टक्के ) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.दोन ओळीतील आणि दोन रोपांतील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि जातीनुसार ठेवावे. काळया कसदार जमिनीत 100 बाय 100 सेंटीमीटर मध्यम प्रतीच्या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीत 60 बाय 60 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवावे. रोपांची लागवड करण्यासाठी सरी वरंबे पाडून वरंब्याच्या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरू असताना केल्यास फायदेशिर ठरते. उन्हाळयात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी 4 नंतर ऊन कमी झाल्यावर करावी.
खते आणि पाणी व्यवस्थापन .
वांग्याच्या ब बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फूरद आणि पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ही खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडाच्या बुध्याभोवती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बांगडी पध्दतीने द्यावीत. वांग्याच्या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फूरद द्यावे.रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे. पाण्याच्या पाळया जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळयात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पध्दतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
आंतरमशागत
वांग्याच्या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे. तसेच झाडास मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो.

Social Plugin