१० वी व १२ वी खेळातील ग्रेस गुणांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार !

Sports Grace Mark 2024 -2025 Maharashtra state board
१० वी व १२ वी खेळातील ग्रेस गुणांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार !










खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी 10 मार्च 2025 पर्यत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार! २०२४ -२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया आपले सरकार पोर्टलद्वारा ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे १० मार्च,२०२५ पर्यत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे इयता १० व १२ खेळाड़ विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन कार्यालयाद्वारे है गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठवले जातात.

सन २०२४ – २०२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाईन करण्यात आलेले आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे. खेळाडू, विद्यार्थी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार पोर्टल द्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावायचा आहे. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्यासाठी सवलत गुणांसाठ फक्त ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणालीद्वारे आपोआप पाठवली जाईल. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालाय, अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पदधतीने अर्ज करता येणार नाही. व अशा प्रकाराचा ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख १० मार्च २०२५ आहे.