मागेल त्याला कृषी पंप योजना या योजनेची माहिती जाणून घ्या
| मागेल त्याला सौर कृषी पंप योजना! शेतकऱ्यांना आता ना लोडशेडींगची चिंता ना वीज बिलाची चिंता! |
शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणली आहे. या सौर कृषी पंप योजने मध्ये शेतकऱ्यांना शेती क्षेत्रा नुसार म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे दोन एकर शेती आहे त्यांना. 3 HP , अडिच ते पाच ऐकर जमीन आहे त्यांना 5 HP , व ज्यांच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे त्यांना 7.5HP , चा सौर कृषी पंप दिला जाईल. यासाठी शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या ऐकून रकमे पैकी फक्त 10% रक्कम भरावी लागेल तसेच जर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त ऐकून रकमेच्या 5% रक्कम भरावी लागणार आहे सौर कृषी पंप योजने साठी केन्द्र सरकार 30%व राज्य सरकारतर्फे 60% अनुदान देणार आहे . या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरण कडे सोपवली आहे . महा वितरण तर्फे नेमलेल्या एजन्सी तर्फे हे पंप बसवले जातील व त्यांच्या दुरुस्ती ची जबाबदारी हि त्या एजन्सी कडे असेल.
मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा पंप संपूर्ण सौर ऊर्जेवर असल्यामुळे शेतकऱ्यांना विज बिलाची चिंता रहाणार नाही. नाही आणि शेतकऱ्यांना विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागणार नाही . विज असो वा नसो दिवसभर हा सौर पंप सौर ऊर्जेवर चालणार आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजना शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता व अटि :
1. मागेल त्याला सौर कृषी पंप योजने ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप बसवले जातील.
2 .मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे दोन एकर जमीन आहे त्यांना 3 HP , ज्या शेतकऱ्यांकडे दोन ते अडीच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांना 5 HP, व ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर व त्यापेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांना 7.5 HP चा मोटर व सौर कृषी पंपाचा संपूर्ण संच दिला जाईल.
3 . अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरीज्या
4 . शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.वै
5 . वैयक्तिक कींवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे:
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:
2. आधारकार्ड प्रत .
3. रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत .
4. पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
इतर कागदपत्रे (लागु असल्यास)
1. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.
2. शेत जमिन / विहीर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
3. अनुसुचित जाती / जमातीचे प्रमाणपत्र.
सौर कृषी पंप योजने साठी अर्ज कुठे करावा :
२ . किंवा आपण जवळच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयात सौर कृषी पंप योजने साठी अर्ज करू शकता.
सौर पंप योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी जाणून घ्यावी
लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.

Social Plugin