युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर


महाराष्ट्रातल्या स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी, दीपाली देशपांडे यांचा समावेश
राष्ट्रपतींच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान केले‌ जतील .
डि गुकेश यांना बुद्धीबळ , मनु भाकर यांना नेमबाजी
हरमनप्रित सिंग यांना हॉकी , प्रविण कुमार यांना पॅरा अथलिटिक्स या खेळामधील उत्कृष्ट कामगिरी साठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे


महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळे यांना नेमबाजी साठी
सचिन खिल्लारी यांना पॅरा अथलिट मधील कामगिरी साठी
अर्जून पुरस्कार व दिपाली देशपांडे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे


युवक विकास आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा केली. पुरस्कार विजेत्यांना 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान केले जातील.

समितीच्या शिफारशींवर आधारित आणि योग्य तपासणीनंतर, सरकारने खालील क्रीडापटू, प्रशिक्षक, विद्यापीठ आणि संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे:

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता ओळखण्यासाठी आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी दिले जातात.

‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ हा मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट आणि सर्वात उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडापटूला दिला जातो.

‘अर्जुन पुरस्कार क्रीडा आणि खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी’ मागील चार वर्षांच्या कालावधीत चांगली कामगिरी आणि नेतृत्व, क्रीडापटूवृत्ती आणि शिस्तीची भावना दाखवल्याबद्दल दिला जातो.

अर्जुन पुरस्कार (आजीवन) हा क्रीडापटूंना त्यांच्या कामगिरीने सन्मानित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी दिला जातो आणि सक्रिय क्रीडा कारकिर्दीपासून निवृत्त झाल्यानंतरही क्रीडा प्रचारात योगदान देत राहतात.

‘द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा आणि खेळांमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी’ प्रशिक्षकांना सातत्याने उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम बनवण्यासाठी दिला जातो.

खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये एकूण सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी दिली जाते.