महाराष्ट्रातील सत्तेचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याचे दिसत नाही बहुमताने निवडून येऊन हि महायुती मध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे ऐकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्या नंतर दिल्ली मध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, ऐकनाथ शिंदे, अजित पवार या महायुतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली तरी अजूनही सत्ता स्थापनेचा निर्णय झालेला नाही. या बैठकी नंतर ऐकनाथ शिंदे हे दरे या आपल्या मुळ गावी निघून गेल्याने शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत

      तसेच शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडले असल्या मुळे त्यांना गृहमंत्री पद मिळावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची केली आहे दिल्ली नंतर राज्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये होनारी बैठक हि रद्द झाली आहे शिवसेनेने‌ गृहमंत्री, अर्थमंत्री पद शिवसेनेला मिळावे अशी मागणी केली आहे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे नेते हे मुख्यमंत्रीपदा सह गृहमंत्री पद आपल्या कडे असावे याबद्दल आग्रही आहेत त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा व खातेवाटपाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्यामुळे येणारया काळात काय समिकरणे दिसुन येतील हे पहावे महत्वाचे आहे